Home Breaking News *तृतीयपंथी समुदायाचे कल्याणाकरीता नोंदणी करण्याचे आवाहन*

*तृतीयपंथी समुदायाचे कल्याणाकरीता नोंदणी करण्याचे आवाहन*

130

*तृतीयपंथी समुदायाचे कल्याणाकरीता नोंदणी करण्याचे आवाहन*

 

गडचिरोली, दि. 31 जुलै (जिमाका): राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी/ ट्रॅासजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन या घटकास समाजाकडुन सापत्न व भेद भावाची वागणुक दिली दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकी मुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासुन दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासना मार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

या समाज घटकांची सर्वागिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे याकरिता गडचिरोली जिल्हयातील तृतीयपंथीयाचे संस्था, तृतीयपंथीयांच्या मंडळे व तृतीयंथी यांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनीसह या कार्यालयात नोंदणी करण्याकरिता, कार्यालयासी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!