Home Breaking News जिल्हा सामान्य रूग्णालयात दिव्यांगाची होणारी हेळसांड थांबवा

जिल्हा सामान्य रूग्णालयात दिव्यांगाची होणारी हेळसांड थांबवा

136

जिल्हा सामान्य रूग्णालयात दिव्यांगाची होणारी हेळसांड थांबवा

***********************

असंघटीत कामगार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांची मागणी

******************

गडचिरोली जिल्हयाच्या विविध तालुक्यातील दिव्यांग नागरिक आरोग्यविशयक समस्या व दिव्यांगाचे दाखले मिळण्यासाठी जिल्हा सामान्य येतात. परंतू दिव्यांना बसण्यासाठी सोय नसल्याने जमिनीवरच बसावे लागते. यामुळे दिव्यांगाना त्रास सहन करावा लागतो. जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, अन्यथा जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कक्षासमोर ठ्यि आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य प्रशासनाना दिला आहे.

 

पेंदोरकर यांनी स्पश्ट केले आहे की, शासनाच्या वतीने दिव्यांगासाठी विविध लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची गरज असते. अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगाना त्रास सहन करावा लागतो. कधी कधी तर प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात. हे लक्षात घेउुन तालुका व जिल्हा स्तरावर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हयाच्या विविध भागातून दिव्यांग नागरिक येतात. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सुचीत केले जाते. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विभाग सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी दिव्यांना बसण्यासाठी सोय नाही. त्यामुळे दिव्यांगाना प्रमाणपत्र वितरण कक्षा समोरच खाली जागेत बसावे लागते. एक प्रकारे रूग्णालय प्रशासनाकडून दिव्यांगाची हेळसांड केली जात आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात येणाऱ्या दिव्यांगाना बसण्यासाठी योग्य ती सोय करावी अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे केली आहे.

Don`t copy text!