Home Breaking News आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या तर्फे राहुल डांगे यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना छत्री...

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या तर्फे राहुल डांगे यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना छत्री भेट

126

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या तर्फे राहुल डांगे यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना छत्री भेट

 

अहेरी विधानसभा मतदार क्षेत्रातील लोकप्रिय, तडफदार व जनकल्याण लोकनेते आमदार धर्मरावबाबा आत्राम (माजी कॅबिनेट मंत्री) , तथा आमदार विधानसभा क्षेत्र अहेरी

यांच्या तर्फे, आणि राहुलजी डांगे (शहर अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच अध्यक्ष, लोककल्याण फाउंडेशन आष्टी),

यांचे मार्गदर्शनात, आज दिनांक 1/8/2025 ला

सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी. येथील विद्यार्थ्यांना

छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून, सौ. ममताताई डांगे,राखीताई मडावी,सरोजाताई बोंडे, मान. कु. एस. डी. गलबले (मु.अ), मान. एम यु खोब्रागडे पदविधर अध्यापक,चंद्रवैभव आत्राम, नितीन सेडमाके हे प्रमुख अतिथी होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल डांगे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे द्विप प्रज्वलित करुन, पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गावातील समाजबांधव व पालकांना ही छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल डांगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या समाजसेवेच्या

कार्यासाठी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे आभार, शाळेतील सहा. शिक्षक मा. पी. टी. वाकडे सर यांनी केले. तर सुत्रसंचालन मात्र. आय .एम. शेरेकर गुरुजी यांनी केले. पावसाळ्याचे दिवस पाहून शालेय विद्यार्थ्यांना छत्री भेट दिल्याने राहुलजी डांगे (शहर अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच अध्यक्ष, लोककल्याण फाउंडेशन आष्टी), यांचे शालेय विद्यार्थ्यांनी आभार मानले

 

 

आजचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, शाळेतील समस्त शिक्षकांनी, मा. बि. ए. क्षिरसागर सर, स. शि. , मा. टी. एम. मल्लेलवार सर स. शि., मा. के. आर. मसराम सर पधविधर शिक्षक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच शाळेतील समस्त विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

 

अशाप्रकारे आजचा संपूर्ण कार्यक्रम, आदरनिय राहुलजी डांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली योग्य व यशस्वी रीत्या पार पडला…

Don`t copy text!