Home Breaking News *आधारविश्व फाऊंडेशन चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा* 

*आधारविश्व फाऊंडेशन चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा* 

76

*आधारविश्व फाऊंडेशन चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा*

 

गडचिरोली : आधारविश्व फाऊंडेशन चा ९ वा वर्धापन दिन आधारविश्व फाऊंडेशनच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा डॉ. विना जंबेवार, सचिव प्रा. सुनीता साळवे, प्रा. विजया मने होत्या. दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर नेहमीप्रमाणे “हिच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे” या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

यावेळी आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांना *महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार* मिळाल्याबद्दल फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

२०१७ मध्ये गीताताई हिंगे यांच्या कल्पनेतून अगदी बोटावर मोजण्या इतक्या समवयस्क मैत्रिणी सोबत घेऊन आधारविश्व फाऊंडेशन ची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम खंड न पडता सातत्याने राबवीले जातात.ही संस्था फक्त महिलांचीच असून त्यांच्या सतत नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमामुळे आधारविश्व फाऊंडेशनची जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. कोरोना महामारीत तर या फाऊंडेशन च्या सदस्यांनी केलेले कार्य वखाणण्याजोगे आहे.आणि विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम कुठलेही अनुदान न घेता स्वखर्चाने केले जाते.

अध्यक्षीय भाषणाचे पुष्प गुंफतांना गीता हिंगे म्हणाल्या, “२०१७ मध्ये मी एक रोपटं लावल होत त्याच वृक्षात रूपांतर झाल आणि आता वटवृक्षात रूपांतर होत आहे हे सर्व माझ्या एकटीमुळे नाही तर तुमच्या सर्वांची साथ आणि सहकार्यामुळे शक्य झाल. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून तुम्हा सर्वांचा आहे म्हणून हा पुरस्कार मी आधारविश्व फाऊंडेशनला समर्पित करते. या पुरस्कारामुळे माझ्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने शेवटच्या श्वासापर्यंत आधारविश्व फाऊंडेशन चे कार्य अविरत सुरू राहील”

कार्यक्रमादरम्यान वंदनाताई गिते, मिनल हेमके ,सुनीता आलेवार,फरझाना शेख , शिल्पा हेमके , अंजली देशमुख, सीमा कन्नमवार, संगीता नवघडे ,संजीवनी मने इ. सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. आधारविश्व फाऊंडेशन ला जुळल्यामुळे आमचे जीवन कसे बदलले , जगण्याची उर्मी मिळाली हे सांगताना काही जनी भावनिक झाल्या तर काहींना

अश्रू अनावर झाले.

यावेळी उपाध्यक्षा विना जंबेवार, सचिव सुनीता साळवे यांनी फाऊंडेशनच्या स्थापनेपासून मोलाचे योगदान दिल्याबद्दल तसेच विजया मने मॅडम यांची प्राचार्य म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल व मिरा कोलते या परिसेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल या सर्वांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजया मने मॅडम यांनी केले तर सूत्र संचालन मिरा कोलते व आभारप्रदर्शन प्रतिमा सोनवने हिने केले.

यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या सदस्या लता संतोषवार ,प्रिया निशाणे,आरती सरोदे , अर्चना कवासे, धनश्री तुकडदेव ,प्रिती मेश्राम, उज्वला करपे, भूमिका बरडे, भारती खोब्रागडे , उज्वला शिंदे , विजया चव्हाण, इंदू नारदेलवार,संजीवनी मने, वर्षा बच्चुवार, अल्का कत्रोजवार,संगीता राऊत,मंजुषा आंबटवार, वर्षा शेडमाके, रसिका मारगाये तसेच अन्य आधारविश्व फाऊंडेशनच्या सदस्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Don`t copy text!