Home Breaking News *एम.जे.एफ.हाय. तथा क. महा.आष्टी येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप*

*एम.जे.एफ.हाय. तथा क. महा.आष्टी येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप*

121

*एम.जे.एफ.हाय. तथा क. महा.आष्टी येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप* आज दिनांक 05ऑगस्ट 2025 रोजी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी सावित्रीच्या लेकींना मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकलचे वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैभव शिक्षण मंडळ आहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हकीम उर्फ बबलू भैया शाहीनभाभी हकीम राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभागीय अध्यक्ष नागपूर त्याचबरोबर आष्टी येथील सरपंच बेबीताई बुरांडे तसेच मार्कंडा (कंसोबा) सरपंच वनश्री चापले ग्रामपंचायत सदस्य विजय बहिरेवार प्राचार्य किशोर पाचभाई त्याचबरोबर पर्यवेक्षक घाटबांधे

महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंजूर झालेल्या १०७ सायकली विद्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या. यावेळी शाहीनभाभी हकीम यांनी सायकल प्राप्त झालेल्या विद्यार्थिनीं सोबत हितगुज केली त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना योग्य असे मार्गदर्शन सुद्धा केले. यावेळी पनवेल या ठिकाणी लोकसत्ता समूहातर्फे जीवन गौरव गाथा सन्मानित झालेल्या शाहीनभाभी हकीम यांना महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे प्राचार्य किशोर पाचभाई यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंक्लेश रोहनकार यांनी केले.

Don`t copy text!