*खेळाच्या माध्यमातून कौशल्य विकसित करावे* – आमदार डॉ. मिलिंद नरोटे
*श्री गणेश स्पोर्ट्स असोसिएशन, आनंदग्राम तर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न*
चामोर्शी :- आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते ‘श्री गणेश स्पोर्ट्स असोसिएशन, आनंदग्राम (ता. चामोर्शी) आयोजित फुटबॉल प्रतियोगिता २०२५ चे उद्घाटन फित कापून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना आमदार डॉ. नरोटे म्हणाले,”खेळ म्हणजे केवळ टाइमपास नसून तो एक जीवनशैली आहे. मैदानावरचा प्रत्येक सामना आपल्याला हार-जीत स्वीकारण्याची मानसिकता शिकवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी खेळात सातत्याने भाग घेऊन नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि सहकार्याची भावना अंगीकारावी. आजच्या युगात करिअरच्या अनेक वाटा खेळाच्या माध्यमातून खुल्या झाल्या आहेत.”खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रफुल्लित होते आणि शिस्तप्रिय जीवनशैली विकसित होते. खेळाच्या माध्यमातून केवळ वैयक्तिक विकासच नव्हे तर गावाचा आणि देशाचाही विकास साधता येतो. त्यामुळे युवकांनी नियमितपणे खेळात सहभागी होऊन आपली कौशल्ये विकसित करावीत”, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही प्रचंड प्रतिभा असते. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास या खेळाडूंमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडू शकतात. यासाठी शासन तसेच स्थानिक संस्था पुढाकार घेत आहेत. श्री श्री गणेश स्पोर्ट्स असोसिएशनचे आयोजन निश्चितच कौतुकास्पद आहे.”
यावेळेस प्रामुख्याने माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास फौजदार, अनिलजी पोहनकर, रोशनीताई वरघण्टे, राकेशजी सरकार, मधुकरजी भांडेकर, अनिलजी तिडके, नामदेवजी सोनटक्के, विलासजी ऊईके, अनिताजताई रॉय, अकुली बिस्वास, नीरज रामानुजनवार, निरंजन बाछाड, किशोरजी कुंडू, मिहीर बिस्वास, कविता किरमे, विश्वनाथ मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.






