Home Breaking News बेजबाबदार इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनावर गुन्हे दाखल करा

बेजबाबदार इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनावर गुन्हे दाखल करा

142

 

बेजबाबदार इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनावर गुन्हे दाखल करा

 

शेतकरी कामगार पक्ष व आझाद समाज पक्षाची मागणी

 

गडचिरोली : आरमोरी येथे जूनी इमारत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. इमारती मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि निष्पाप लोकांचा बळी गेला. याला सर्वस्वी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांचे विरोधात हत्येचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.

Don`t copy text!