*बी. ए. पब्लिक स्कूल, अहेरी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व दहीहंडी उत्सव *
*तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थांचा वाढवला उत्साह…*
अहेरी येथील डी. बी. ए. पब्लिक स्कूलमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस स्पर्धा व दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चिमुकल्यांनी श्रीकृष्ण-राधा आणि इतर पारंपरिक वेशभूषांमध्ये सजून सर्वांचे मन जिंकले. बालगोपालांनी दहीहंडी फोडून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या प्राचार्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, कुलमेथे मॅडम, सुनतकर सर व मिस. नेहा पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी कैदलवार व हिना खान यांनी केले.
मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले व त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
या कार्यक्रमाला देशपांडे सर, आनंद झाडे सर, मनोज कैदलवार सर, मनीषा मुडपल्लीवार, शमीना मॅडम, पल्लवी दहागावकर, निशिगंधा दहागावकर, कशिश शेख, सबा आफरीन, मोमिना शेख यांच्यासह मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.






