श्री हनुमान मंदिर देवस्थान सीताबर्डी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा….
आरमोरी :-
श्री हनुमान मंदिर देवस्थान सीताबर्डीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. अतिशय प्राचीन असलेल्या श्री हनुमान मंदिराला १०० वर्षापासूनची परंपरा कायम राखली आहे…
आज सकाळपासूनच तान्हा पोळा सणाची उत्सुकता लहान मुलांमध्ये दिसून येत होती श्री हनुमान मंदिरातर्फे भव्य नंदीबैल सजावट स्पर्धा व लक्की ड्रॉ ठेवण्यात आला होता.तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. मंदिर परिसरात तोरण,फुगे,रंगरंगोटी सजावटीमुळे मंदिर परिसर गजबजून गेले होते. सर्वप्रथम नंदीबैलाची विधिवत पूजन मंदिराच्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले. या स्पर्धेत १५३ नंदीबैल धारकांनी सहभाग घेतला होता.या सर्व नंदीबैलाचे परीक्षण करून विजेते घोषित करण्यात आले. यामध्ये प्रथम बक्षिस कु.विधी वणवे, द्वितीय धरणी आखाडे, तृतीय ओवी ठाकरे, चौथे रुन्वा धात्रक,पाचवे समिथा मने यांनी पटकावला. त्यानंतर लगेच लक्की ड्रॉ काढून ७ विजेत्यांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना श्री.माणिक भोयर,विजय गोंदोळे,संजय गोंदोळे,भगवान गोंदोळे, राजू वडपल्लीवार, भोजराज हेमके, बंडूजी डोकरे,राहुल तितीरमारे, चंदू वडपल्लीवार, पुरुषोत्तम गाढवे, महेंद्र शेंडे, विनायक गोंदोळे, सौ.लक्ष्मी मने, सौ.अर्चना गोंदोळे,प्रकाश झलके,योगेश बनसोड, या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीतेकरीता श्री हनुमान मंदिर देवस्थान सीताबर्डीचे अध्यक्ष राजेश वडपल्लिवार, सचिव देवानंद दुमाने,सुरेश सोरते,श्रीकांत डोकरे, गुलाबजी मने सर,राहुल गोंदोळे,अंकुश गाढवे,स्वप्नील कापकर, गोवर्धन गाढवे,पवन भोयर,हर्षल गोंदोळे, पीयुष गोंदोळे, साहिल गोंदोळे,मनोज, सौरभ गुणवंत गोंदोळे,भूषण रासेकर, मुखरु गोन्नाडे यांचे सहकार्य लाभले.






