Home Breaking News *गडचिरोली-चामोर्शी हायवेवरील पोर व पोटफोडी नदीवरील रखडलेले  पुलियाचे बांधकाम त्वरित करा;  अन्यथा...

*गडचिरोली-चामोर्शी हायवेवरील पोर व पोटफोडी नदीवरील रखडलेले  पुलियाचे बांधकाम त्वरित करा;  अन्यथा चक्काजाम आंदोलन करू गडचिरोलीला काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा*

179

*गडचिरोली-चामोर्शी हायवेवरील पोर व पोटफोडी नदीवरील रखडलेले  पुलियाचे बांधकाम त्वरित करा;  अन्यथा चक्काजाम आंदोलन करू गडचिरोलीला काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा*

गडचिरोली ::  गडचिरोली अतिदुर्ग जिल्हा असून जिल्ह्यात दळणवळणाकरीता रस्ते हाच प्रमुख मार्ग आहे, मात्र गडचिरोली -चामोर्शी रस्त्यावरील शिवनी जवळील पोटफोडी नदी व  तळोधी येथील पोर नदीवरील अर्धवट असलेले पुलियाचे काम यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताला चालना मिळत असून प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा हा प्रमुख मार्ग असताना व या मार्गावरून जिल्ह्यातील बरेच प्रमुख अधिकारी दररोज प्रवास करत असतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला एक नंबरचा जिल्हा बनवण्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा करतात मात्र जिल्ह्यातील मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असताना व वारंवार मागणी करूनही सदर ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती होत नाही त्यामुळे आठ दिवसाच्या आत शिवनी येथील पोटफोडी नदी  व तळोधी येथील पोर नदीच्या पुलिया जवळील खराब रस्ता प्राधान्याने दुरुस्ती करून त्या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यात यावे व लवकरात लवकर रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे अन्यथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

Don`t copy text!