Home Breaking News *_ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात गडचिरोलीत भाजपाचा जाहीर निषेध...

*_ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात गडचिरोलीत भाजपाचा जाहीर निषेध आंदोलन_*

173

*_ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात गडचिरोलीत भाजपाचा जाहीर निषेध आंदोलन_*
——————————––—–
*_मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती_*

गडचिरोली, दि. २८ ऑगस्ट २०२५ :
ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्याच्या मागणीवरून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात आज दि.२८आँगस्ट २०२५ गुरुवार ला गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी – ओबीसी मोर्चा, गडचिरोली यांच्या वतीने भव्य व आक्रमक जाहीर निषेध आंदोलन पार पडले.

या आंदोलनात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, ओबीसी नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार क्रिष्णाभाऊ गजबे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते, का.मो.प्र. सचिव गोवर्धन चव्हाण, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिनजी कोडवते, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, ओबीसी मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अनिल पोहनकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, तालुकाध्यक्ष दतुजी सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल तिडके, पुष्पा करकाडे, चंदनखेडे ताई, रविंद्र गोटेफोडे, नंदु पेठेवार, आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, बंडू झाडे, रमेश नैताम, सरपंच आकाश निकोडे, मुक्तेश्वर काटवे, आकाश सातपुते, वासुदेव बट्टे, पिंटुभाऊ आकरे, विनोद देवोजवार, अनिल करपे, दिपक सातपुते, बंटी खडसे, जनार्दन साखरे, विकास पायदलवार, किर्ती मासुरकर, गणेश दहेलकर, रत्नदिप म्हशाखेत्री, शेषराव कोहळे, भाविक आभारे, विशाल मांडवे, दतुजी माकोडे, चंद्रकांत बारसागडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

या निषेध आंदोलनात बोलताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले –
“ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज गडचिरोली जिल्ह्यात निषेधाचा आवाज उठला आहे. यानंतर प्रत्येक तालुक्यात अशाच पद्धतीने आक्रमक निषेध आंदोलन करून जरांगे यांना जागा दाखवली जाईल. ओबीसी आरक्षण हा घटनात्मक हक्क व अधिकार असुन कुणालाही या हक्कांवर गदा आणू दिली जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही आंदोलकांची ठाम भूमिका व मागणी आहे. ओबीसी समाज आपल्या संपूर्ण ताकदीने आणि पाठिशी उभा आहे.”असे या निषेध आंदोलनात मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.
*आंदोलनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
या निषेध आंदोलनात कार्यकर्त्यांनी “जरांगे मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला चपलांचा वर्षाव करून निषेध व्यक्त करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी ठाम आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

या निषेध आंदोलनानंतर भाजपाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अविशयांत पांडा यांची भेट घेऊन व चर्चा करत राज्याचे मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कळविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

Don`t copy text!