श्रेयस राजकुमार वासनिक यांचे आकस्मिक निधन
अंत्यसंस्कार आज पुणे येथे
नागपुर – वृत्तवानी न्यूज
नागपूर येथील हुशार, मनमिळाऊ होतकरू नेहमी कोणालाही मदत करण्यासाठी पुढे येणारा श्रेयस राजकुमार वासनिक हा पॉलिटेक्निक करून रायसोनी कॉलेज नागपूर येथे नुकताच B.Tech. ची पदवी पण केलेला होतकरू विद्यार्थी श्रेयस राजकुमार वासनिक याचे रात्री 1.30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले. तो नागपूर येथेच राहत होता. त्याच्या आईची बदली पुणे येथे झाल्यामुळे तो एक महिन्यापूर्वीच पुणे येथे गेला.अचानक प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला आठ दिवसापूर्वी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.त्यांनी आठ दिवस मृत्यूशी झुंज दिली.पण तो शेवटी अयशस्वी ठरला. व रात्री 1.30 वाजता दुःखद निधन झाले.अशा हुशार होतकरू मनमिळाऊ 21वर्षाचा श्रेयस सर्वांना सोडून निघून गेला.त्यामुळे त्याच्या कुंटुबीयावर व मित्र परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले त्याच्या अकाली निघून जाण्यामुळे सर्वत्र शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे.त्याच्या कुटुंबीयास व मित्र परिवारावर जो आघात झाला त्यातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.