भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे संस्थापक अध्यक्ष, माजी वन राज्यमंत्री, जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी अध्यक्ष स्व. वामनरावजी पाटील गड्डमवार साहेब यांची 88 वी जयंती विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अरुण राऊत हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री संतोष सुरावार, जेष्ठ शिक्षक श्री धनंजय गाडेवार, श्री अरुण चौधरी होते. कार्यक्रमाचे संचालन कु. ममता सातपुते यांनी केले, तर प्रस्ताविक श्री धनंजय गाडेवार यांनी केले. मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री अरुण राऊत, पर्यवेक्षक श्री संतोष सुरावार यांनी स्व. वामनरावजी पाटील गड्डमवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.जुईली उरकूडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home Breaking News भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे संस्थापक अध्यक्ष, माजी वन राज्यमंत्री, जिल्हा...






