Home Breaking News घराकडे परत येत असताना घात झाला, जंगली हत्तीने गुराख्याला चिरडले 

घराकडे परत येत असताना घात झाला, जंगली हत्तीने गुराख्याला चिरडले 

264

घराकडे परत येत असताना घात झाला, जंगली हत्तीने गुराख्याला चिरडले

घराकडे परत येत असताना घात झाला, जंगली हत्तीने गुराख्याला चिरडले

चुरचुरा गावाजवळची घटना : दोघेजण बचावल

 

 

 

गडचिरोली

गुरे जंगलात चारून

गावाकडे परत येत असताना जंगलातून अचानक रानटी हत्ती निघाले. कळपातील एका हत्तीने समोर आलेल्या गुराख्याला सोंडेने उचलून रस्त्यालगत पाटात आदळले. त्यानंतर पायाने तुडवून जागीच ठार केले. ही हृदयद्रावक घटना पोर्ला वनपरिक्षेत्रात चुरचुरा बिटातील जंगलात बुधवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास घडली.

वामन मारोती गेडाम (६२) रा. चुरचुरा (मालगुजारी) असे हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. गेडाम नेहमीप्रमाणे स्वमालकीची गुरे चारण्यासाठी चुरचुरा-पिपरटोला जंगलात सकाळी ११ च्या सुमारास गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ

वामन गेडाम

महादेव गेडाम व हिरोबी खोब्रागडे हेसुद्धा होते. त्या दोघांचीही जनावरे चराईसाठी होती. चुरचुरा-पिपरटोला मार्गाच्या कडेला गुरे चारल्यानंतर सायंकाळी गुरे घराकडे घेऊन येत असताना जंगलातून दक्षिण दिशेने अचानक हत्ती निघाले. तेव्हा महादेव गेडाम व हिरोबी खोब्रागडे हे जिवाच्या आकांताने पळाले. मात्र, वामन गेडाम हे हत्तीच्या तावडीत सापडल्याने हत्तीने रस्त्यावरून त्यांना सोंडेने पकडून रस्त्यालगतच्या पाटात आदळले. त्यानंतर पायाने तुडविल्याने गेडाम हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. सायंकाळी ७ वाजता शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोर्लाच्या

अन् अंदाज चुकला

वामन गेडाम व त्यांच्या सोबत्यांना हत्तींचा कळप रस्ता ओलांडून गेला, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी गावाच्या दिशेने गुरे वळविली व ते पिपरटोला-चुरचुरा रस्त्यानेच गावाकडे परत येत होते. मात्र, काही हत्ती जंगलात होते.

यापैकीच हत्तींनी वामन गेडाम यांना चिरडून ठार केले. वामन व त्यांच्या सोबत्यांनी संपूर्ण हत्ती उत्तर दिशेने म्हणजेच देशपूरच्या दिशेने गेल्याचा अंदाज लावला होता, मात्र तो चुकल्याने ही हृदयद्रावक घटना घडली

Don`t copy text!