विघ्नहर्त्याला सायबर विघ्नासाठी जे. एम. पटेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे साकडे
गणेशपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जे. एम. पटेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सायबर सुरक्षेचा संदेश
बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सन्मित्र गणेश मंडळाच्या गणेशपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जे. एम. पटेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम सादर केले.
आज मानव टेकनॉलॉजीच्या युगात जगत आहे. आपले सर्व दैनंदिन कामे टेकनॉलॉजिच्या साहाय्याने सुखकर झालेले आहेत. टेकनॉलॉजिचे अनेक फायदे आहेत. पण या फायद्यांबरोबरच काही धोके सुद्धा आहेत. दा आहेत. कधीकधी हे धोके धोके मनुष्याचा घात सुद्धा करीत असतात. अशा संभाव्य धोक्यांपासून सर्वांना सावध करण्याच्या उद्देशाने जे. एम. पटेल कॉलेजचे सायबर वॉरिअर जगप्रसिद्ध अँटीवायरस कंपनी क्विक हिल फॉउंडेशन यांच्यासोबत सायबर सुरक्षेबाबत समाजातील सर्व घटकांना जागृत करीत असतात.
सायबर गुन्हेगारीचे हे विघ्न आता वैश्विक समस्या झालेली आहे आणि यावर आळा घालायचा असेल तर तो फक्त सायबर शिक्षेद्वारेच सर्वांना जागृत करूनच शक्य आहे. म्हणून जे. एम. पटेल च्या २० सायबर योध्यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन २५००० पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना सायबर शिक्षित केले. आणि हे सर्व कार्य जे. एम. पटेल महाविद्यालयाने क्विक हिल फॉउंडेशन, पुणे यांच्या सोबत केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत करण्यात आले.
बुधवारी दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळात जे. एम. पटेल महाविद्यालयातील संगणक विभाग, IQAC सेल, NSS सेल, NCC युनिट तसेच क्विक हिल फॉउंडेशन आणि सायबर पोलीस भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान २० सायबर योद्धयांनी विविध कार्यक्रमांच्या द्वारे सायबर सुरक्षे सायबर सुरक्षेसाठी जनजागृती केली.
या सर्व सायबर योद्धयांनी गणेशपूरच्या राजा समोर पथनाट्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नृत्याविष्काराच्या द्वारे या विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आपल्याला कशाप्रकारे बंदिस्त करतो आणि त्यापासून आपण स्वतःचे सरंक्षण कसे करू शकतो हे सर्व नागरिकांना पटवून दिले.
या सायबर योद्धयांनी विविध सायबर गुन्ह्यांबाबत जनसामांन्यांना माहिती दिली. त्यांच्या शंकांचे निरसन केले. सायबर गुन्हा झालाच तर त्याची माहिती कशी व कुणाला द्यायची याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी या २० सायबर योद्धयांनी अशा अनोख्या उपक्रमाद्वारे ३००० पेक्षा जास्त लोकांना सायबर सुरक्षेबाबत जागृत करून समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्तुत केला.
या प्रसंगी सर्व उपस्थित जनमाणसांना सायबर योद्धयांनी सायबर सूरक्षेची शपथ दिली.
या संपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम, IQAC चे समन्वयक डॉ. कार्तिक पनीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. प्रविण घोसेकर यांनी मार्गदर्शन केले व सर्व सायबर योद्धयांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भंडारा पोलीस अधिक्षक श्री नुरल हसन, सहायक पोलीस अधीक्षक श्री मोरे, सायबर पोलीस स्टेशन चे पोलीस इन्स्पेक्टर हे प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गणेशपूर ग्रामपंचायतचे सरपंच सौ विद्याताई मेहर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय भंडाराचे समुपदेशक श्री सुरेश ठाकरे, सारथी कल्याणकारी संस्थेचे श्री अशोक डेंगे व श्री महादेव बिसने तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी हे प्रामुख्याने उपस्थतीत होते.
प्रस्तुत कार्यक्रमाला सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर चे अध्यक्ष श्री रुपेश टांगले श्री सावन बावणे, श्री पंकज भोंगाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संगणक विभागाचे प्राध्यापक डॉ सबा नसीम, श्री पलाश फेद्देवार, सौ. प्रियंका शर्मा तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रम केले. या सर्व सायबर योद्धयांमुळेच हा संपूर्ण कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीला गेला.






