श्राद्ध विशेष लेखांक 7
तिथी श्राद्धाचे नाव कोणासाठी ?विधीविशेष
1. चतुर्थी किंवा पंचमी (भरणी नक्षत्र असतांना)
भरणी
मृत झालेली –
व्यक्ती (टीप १)
2. नवमी
अविधवा नवमी
अहेवपणी मृत झालेली स्त्री
श्राद्ध न करता सवाष्णीला भोजनहीघालतात
3. त्रयोदशी
बाळाभोळानी तेरस (सौराष्ट्रातील नाव)
लहान मुले
काकबळी
4. चतुर्दशी
घातचतुर्दशी
अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेले
टीप 1 – पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर 12 व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते.
पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व
दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा. (क्रमशः)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलक : श्रीमती विभा चौधरी
संपर्क क्रमांक :7620831487






