*मुख्य कार्यकारी अधिकारी,साईबाबा संस्थान शिर्डी यांना पादुका दर्शन सोहळा निमंत्रण*
. सर्व साई भक्तांना आनंदाने कळविण्यात येते की, आज दिनांक 17.09.2025 रोज बुधवारला *साईबाबा मूळ पादुका दर्शन सोहळा* च्या आयोजक समिती प्रमुखांनी साईबाबा संस्थान शिर्डी येथे जाऊन आपल्या शुभ हस्ते साईबाबा समाधी चरणी पत्रिका ठेवून *मा. गौरक्षक गाडीलकर* (भा.प्र.से ) मुख्य कार्यकारी अधिकारी,साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांना पादुका दर्शन सोहळा निमंत्रण पत्रिका देऊन निमंत्रित करण्यात आले.






