ग्रामपंचायत हालेवारा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास सुरुवात
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थाचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थे मार्फत ग्रामीण भागाचा विकास करणे हे मुख्य ध्येय आहे, राज्यातील विकासाच्या बहुतांच योजना पंचायत राज संस्थेमार्फत राबविल्या जातात, त्या अनुषंगाने ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदन्ना कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे अवश्यका आहे. ग्रामविकास विभाग व शासनाच्या इतर विभागाच्या विविध योजना जिल्हा परिषदेचे मार्फत रबविल्या जातात. सदर योजनाची प्रभावी व जलद गतीने अमलबजावणी करून, त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवीने, यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविणे, ग्रामपंचायत मध्ये लोक सहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत चा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था गतिमान करने या संकल्पनेतून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान “राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत हालेवारा येथे अभियानाची सहभागी होणेस्तव दिनांक 17/9/2025 रोजी अभियान बाबत कार्यशाळा व ग्रामसभा मा. उप सरपंच संध्याताई कन्नलवार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली, सभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी श्री धनंजय कोठारे यांनी अभियानाचे विविध पैलू समजावून सांगिलले, व अभियानात सक्रिय सहभाग घेण्यास सहकार्य करणे बाबत आव्हाहन केले, ग्रामसभेत सहा. गट विकास अधिकारी श्री श्रीकृष्ण पेंदाम साहेब यांनी मार्गदर्शन केले, तसेच आरोग्य विभाग, कृषी, विभाग, महसूल विभाग, शिक्षण विभाग बाबत ग्रामपंचायत हालेवारा अंतर्गत संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका अवगत केली व अभियानात सक्रिय सहभागी होत असल्याचे जाहीर केले.
ग्रामसभेत ग्रामपंचायत हालेवारा अंतर्गत 11 गावातील सर्व,पोलीस पाटील, मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका, बचत गट अध्यक्ष सचिव, आशा, ग्रामकोश समिती सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी सेव सहकारी संस्थेचे प्रतिनिधी, माजी सरपंच तथा बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला






