चामोर्शी – गडचिरोली रोडवर पोहर नदीवरील पुलावर खराब रस्त्यामुळे जवळपास 5 किलोमिटर ट्रॅफिक जॅम
*!! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच अधिकारी व मुजोर ठेकेदाराच्या नालायक पणामुळे सर्वसामान्य जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना व अनेक रूग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे….. !!*
*!!जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जर अशाप्रकारे प्रशासनाच्या व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे जर सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडणीय कारवाई सह फौजदारी कार्यवाही करण्याचे ठरले असतांना कोणाच्या मेहरबानीमुळे अशाप्रकारची परस्थिती निर्माण होत आहे व वारंवार तक्रारी व आंदोलने करून सुद्धा यांची का दखल घेण्यात येत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे व जनतेत मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे…. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केलेली आहे……!!*






