Home Breaking News *राज्यावरील कर्ज फेडण्यासाठी लोहखनीजाची रायल्टी प्रतिटन 4000 करा – सुरेश पद्मशाली*

*राज्यावरील कर्ज फेडण्यासाठी लोहखनीजाची रायल्टी प्रतिटन 4000 करा – सुरेश पद्मशाली*

89

*राज्यावरील कर्ज फेडण्यासाठी लोहखनीजाची रायल्टी प्रतिटन 4000 करा – सुरेश पद्मशाली*

*गडचिरोली दि. 19- महाराष्ट्र राज्यावरील लाखो कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी लोहखनीजाची रायल्टी प्रति टन 4000 रूपये करावी अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केली आहे.*

*माजी मंत्री व अहेरी चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी लोहखनीजाच्या रायल्टीतून राज्य कर्जमुक्त होईल असे म्हटले होते.*

*सद्या केवळ 2.6 कोटी टन लोहखनीजाच्या उत्खननातून राज्याला केवळ 2000 कोटी रूपये रायल्टी मिळणार आहे. यातून राज्य कधीही कर्जमुक्त होणार नाही. राज्याला कर्जमुक्त करायचे असेल तर किमान दरवर्षी 1 लाख कोटी रूपयांची गरज भासेल.*

*सद्या बाजारात लोखंड अंदाजे 50 हजार रूपये टन आहे व लोहखनीज 6000 ते 7000 रूपये प्रति टन आहे. लोहखनीजावर केवळ 15 टक्के म्हणजे 900 रूपये रायल्टी घेण्यात येत आहे.*

*लोहखनीजाचा सद्याचा उत्खनन खर्च 1000 रूपये प्रति टन लक्षात घेऊन रायल्टी 4000 रूपये आकारली तरी कंपनी ला 1000 प्रति टन प्रमाणे हजारो कोटी मिळतील व शासनाला ही हजारो कोटी रूपये रायल्टीतून मिळतील.*

*शासनाने अनेक कंपन्यांना लोहखनीजाची लीज मंजूर केली आहे परंतु कवडीमोल भावाने लोहखनीज न देता किमान 4000 रूपये दराने लीज द्यावी व महाराष्ट्राला कर्जमुक्त करावे अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान च अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केली आहे.*

Don`t copy text!