महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने पुनर्रचना धोरणाचा निषेध नोंदवला.
दिनांक. १९.०९.२०२५ ला महावितरण मंडळ कार्यालय, गडचिरोली समोर महावितरण कंपनीकडुन नविन पुनर्रचना प्रस्तावाची एकतर्फी अंमलबजावणी करित असल्यामुळे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र विज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय विद्युत कर्मचारी संघटन, महाराष्ट्र राज्य विज कामगार काँग्रेस (इंटक), म. रा. स्वाभिमानी विद्युत वर्कर्स फेडरेशन, तांत्रीक कामगार युनियन या सात संघटनांच्या कृती समिती तर्फे द्वारसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. कर्मचाऱ्यांनी दि. १९.०९.२०२५ ला काळी फिती लावुन काम केले व द्वारसभेद्वारे एकतर्फी कंपनी पुनर्रचना धोरणाचा निषेध नोंदवला.
महावितरण कंपनी प्रशासनाने दि. ११.०९.२०२५ संघटना सोबत बैठक घेवुन संघटनांनी सुचवलेल्या सुचना व प्रस्तांवांचा अंतर्भाव न करता दि. २२.०९.२०२५ पासुन महावितरण कंपनीत एकतर्फी पुनर्रचना लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्रातील ७ मंडळ वगळता संपुर्ण महाराष्ट्रात एकावेळी पुनर्रचना लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनांची प्रशासनाला कंपनीने तांत्रीक कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करावे, नविन शाखा कार्यालय व उपविभाग निर्माण करावे, नविन कर्मचारी पदभरती करावे, अशी आंदोलनाद्वारे मागणी आहे. घाईघाईने पुनर्रचना लागु केल्यास त्याचा दुष्परिणाम कंपनींच्या कामकाजावर होईल.
कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देवुन कंपनीच्या एकतर्फी पुनर्रचना धोरणाचा निषेध केला. सदर द्वारसभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे मंडळ अध्यक्ष श्री. रंजन बल्लमवार, श्री. आशिष बुरडे, सबऑडीनेट इंजिनियअर असोसीएशन संघटनेतर्फे मंडळ सहसचिव श्री. कृणाल बागुलकर, श्री. लक्ष्मीकांत पुट्टावार व महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे मंडळ सचिव श्री. सुधिर चौधरी यांनी द्वारसभेला संबोधीत केले. द्वारसभेला मोठ्या संख्येने अधिकारी / अभियंते / कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती.






