आरमोरी येथे बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शक पर भाषण होणार
राज्यातील शेतकरी, शेतमजूर, निराधार, मेंढपाळ,मच्छिमार, दिव्यांग बांधव यांच्यासाठी हक्काने सरकार दरबारी आवाज उठविणारे लोकनायक प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माननीय *श्री. बच्चूभाऊ कडू* यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी हक्क यात्रा चालू असून त्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा दौरा लागलेला असून त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग साठी मार्गदर्शन तसेच दिव्यांगांचे अधिकार व हक्क यासाठी जाहीर सभा दिनांक *२४-०९-२०२५* रोज बुधवारला ला दुपारी *२* वाजता आरमोरी येथील बर्डी टी पाईन्ट जवळील *साई दामोदर मंगल कार्यालयात* आयोजित करण्यात आली असून या जाहीर हक्क सभेत शेतकरी, निराधार, दिव्यांग, विधवा, शेतमजूर यांना मार्गदर्शन व संबोधित करणारं असून दिव्यांग बांधवांचे हक्क व त्यांचे अधिकार यावर *मा. बच्चूभाऊ कडू*
यांचे मार्गदर्शक पर भाषण होणार आहे. तरी या जाहीर सभेला निराधार, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, विधवा, मेंढापाळ व उपेक्षित घटकांनी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन *आरमोरी प्रहार दिव्यांग क्रांती पक्षातर्फे करण्यात येत आहे.*






