Home Breaking News महिलेला बांबूच्या काठीने मारहाण करणा­या पाच आरोपींना मा. न्यायालयाने सुनावली सश्रम कारावास...

महिलेला बांबूच्या काठीने मारहाण करणा­या पाच आरोपींना मा. न्यायालयाने सुनावली सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

149

 

महिलेला बांबूच्या काठीने मारहाण करणा­या पाच आरोपींना मा. न्यायालयाने सुनावली सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

 

* मा. प्रथम श्रेणी न्यायाधीश, धानोरा श्रीमती एन. ए. पठाण यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन मुरमगाव येथे दिनांक 13/03/2020 रोजी पिडीता हीने फिर्याद दिली होती की, मौजा सिंदेसुर ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील रहिवासी 1) लिलाबाई बिसाऊ गोटा, 2) सोबराज अलीयारसिंग मडावी, 3) कोलीबाई सोबराज मडावी, 4) लालतीबाई धनीराम गावडे व 5) रगोतीबाई सोबराज मडावी यांनी फिर्यादी सौ. दुलोबाई फत्तेसिंग धुर्वा हिला दिनांक 12/03/2020 रोजी सकाळी 11:00 वा. च्या सुमारास इलेक्ट्रिक पोलला बांधून तसेच अंगावरील वस्त्रे फाडून बांबूच्या काठीने मारहाण केली आहे.

 

फिर्यादीच्या अशा तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे मुरुमगाव येथे दिनांक 13/03/2020 रोजी ऑक्रंस क्रमांक 01/2020 कलम 324, 341, 354 (ब), 34 भादवि नोंद करुन सदर बाबत दिनांक 13/03/2020 रोजी पोस्टे धानोरा येथे अप क्र. 24/2020 कलम 354, 354 (ब), 341, 324, 34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्रातील तपासी अधिकारी मपोउपनि. अंजली मेवासिंग राजपूत यांनी वरीलप्रमाणे असलेल्या पाचही आरोपींना दिनांक 14/03/2020 रोजी अटक करुन, तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 06/2020 नुसार खटला मा. न्यायालयात चालवून फिर्यादी, इतर साक्षीदारांचे बयाण व वैद्यकिय पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दिनांक 19/09/2025 रोजी आरोपी क्र. 1) लिलाबाई बिसाऊ गोटा, 2) सोबराज अलीयारसिंग मडावी, 3) कोलीबाई सोबराज मडावी, 4) लालतीबाई धनीराम गावडे व 5) रगोतीबाई सोबराज मडावी सर्व रा. सिंदेसुर ता. धानोरा, जि. गडचिरोली यांना मा. प्रथम श्रेणी न्यायाधीश, धानोरा श्रीमती. एन. ए. पठाण यांनी पाचही आरोपींना कलम 354, 354 (ब), 341, 324, 34 भादवि मध्ये दोषी ठरवुन एक वर्ष सश्रम कारावास, एक वर्ष साधा कारावास, दोन महिने साधा कारावास अशी कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 15,000/- प्रमाणे एकूण 75,000/- हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच सर्व पाचही आरोपींनी वरील शिक्षा एकाचवेळेस भोगायची आहे अशी तरतुद करण्यात आलेली आहे.

 

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. बी. के. खोब्राागडे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा तपास मपोउपनि. अंजली मेवासिंग राजपुत पोस्टे धानोरा यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोस्टे धानोराचे श्रेणी पोउपनि सलामे व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

Don`t copy text!