*_गडचिरोलीत जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न_*
——————————————–
*_माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ.._*
गडचिरोली (दि. २७ सप्टेंबर २०२५) :
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने “Grand Launch of Namo Yuva Run 2025 – For a Nasha Mukt Bharat” या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून सुरू होऊन शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. तसेच स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडले.
*विविध गटांतील विजेते स्पर्धक :*
*खुला गट – मुली :*
रुचिका सुतीन नागरकर, लावण्या सुभाष नागरकर, मंदा तुकलवार
*खुला गट – मुले :*
रोषण बोदलकर, सौरभ कन्नाके, निखिल टेंभुर्णे
*वयोगट 14 ते 18 – मुली :*
वृंदा भुरसे, संध्या नरोटे, अश्विनी खेडेकर, गिताजंली चौधरी
*वयोगट 14 ते 28 – मुले :*
विवेक भगत, विवेक भोयर, हर्षल सुरकर
*जेष्ठ नागरिक :*
ज्ञानेश्वर दुर्गे, शामराव सुरजागडे
जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “नशामुक्त भारत” या घोषवाक्याला प्रत्यक्ष कृतीतून बळकटी देत या उपक्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या भव्य उपक्रमावेळी प्रामुख्याने गडचिरोली चे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, कि.मो.प्र. सचिन रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री गिताताई हिंगे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, भाजयुमो महामंत्री आकाश सातपुते,हर्षल गेडाम,साई सिल्लेवार, देवाजी लाटकर, सीमा कन्नमवार, पुष्पा करकाडे, केशव निंबोड, दतु माकोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले.






