*_मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचा कुरखेडा तालुक्यात दौरा – माँ दुर्गेचे दर्शन व गाव समस्यांची घेतली माहिती_*
ता.कुरखेडा (दि. २८ सप्टेंबर २०२५) :
कुरखेडा तालुक्यातील कढोली, शिरपुर व जांबुळखेडा या गावांमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या ठिकाणी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांनी भेट दिली.
या प्रसंगी त्यांनी सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळ, कढोली; नव दुर्गा उत्सव मंडळ, शिरपुर; तसेच श्री.गुरुदेव सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, जांबुळखेडा येथे माँ दुर्गेचे मनोभावे पूजन-अर्चन करून दर्शन घेतले. उपस्थित नागरिकांना नवरात्र व दुर्गोत्सवाच्या शुभेच्छा देत मा.खा. डॉ. नेते यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून स्थानिक अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
यावेळी मा.खा. डॉ. नेते म्हणाले की, ” माझ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केलेले असून पुढील काळात या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या दुष्टीने प्रगती पथावर राहील अशी ग्वाही देतोय. कढोली, शिरपुर, जांबुळखेडा यांसह संपूर्ण तालुक्यातील छोटे मोठे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”असे व्यक्तव्य मा.खा.डॉ. नेते यांनी केले.
यावेळी सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मा.खा. डॉ. नेते यांचे स्वागत केले.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेवजी फाये, कढोलीचे सामाजिक नेते व भाजपाचे सक्रिय नेते पिंटुभाऊ आकरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर पेटकर, डॉ. विवेक आकरे, भाजपा युवा नेते विनोद नागपुरकर, विकास पायडलवार, माजी सरपंच चंद्रकांत चौके, दुर्गा मंडळाचे अध्यक्ष अजय नंदनवार, उपाध्यक्ष संतोष ढोने, सचिव शंकर ठाकरे, कुष्णाजी नेवारे, सेवाकर सहारे, शिरपुर येथील सरपंच कुरेशा मडावी, रमेश बावणथडे, नुसारम कोकोडे, जानबाजी दुमाने, मधुकर हिडके, लोकचंद बावणथडे, परसराम परसो, जांबुळखेडा येथील अध्यक्ष पुंडलिक दाजगाये, गणपत बनसोडे, विवेक गहाने, दिनेश मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामुळे कढोली, शिरपुर व जांबुळखेडा गावांत उत्साहाचे व भक्तीमय वातावरण पसरले होते.