प्रकृती गंभीर झालेल्या गर्भवती मातेस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने तातडीचे वैद्यकीय उपचार मिळाले, माता
सुरक्षित
गडचिरोली, दि. १४ ऑक्टोबर २०२५: जिल्हा परिषद, गडचिरोली आरोग्य विभाग अंतर्गत गोटेतोला उपकेंद्र जारावंडी) येथील एका १९ वर्षीय गर्भवती मातेला उच्च रक्तदाब (Hypertension) व झटके (संभाव्य एक्लॅम्पसिया) आल्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत आरोग्य पथकाने तातडीने कार्यवाही करत मातेचा जीव वाचवला आहे.
माहिती व कार्यवाहीचा तपशीलः
मातेची स्थितीः रुनिता राहुल दुम्मा (वय १९, रा. गोटेटोला) ही माता उच्च रक्तदाबाने (BP १४०/९०) त्रस्त होती. तिच्यावर २६ सप्टेंबर २०२५ पासून आवश्यक औषधोपचार (Labetalol) सुरू होते आणि उपकेंद्र जाराचंडी येथील कर्मचाऱ्यांचे नियमित गृह-निरीक्षण सुरू होते.
गंभीर प्रसंग: दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मातेला अचानक झटके येऊ लागल्याची माहिती आशा स्वयंसेविकेकडून प्राप्त झाली. ही स्थिती ‘एक्लॅम्पसिया’ (Eclampsia) सारख्या गुंतागुंतीकडे घेऊन जाऊ शकते, हे लक्षात येताच केंद्रातील वैद्यकीय पथक तातडीने रुग्णवाहिकेसह पोहोचले.
* कर्मचाऱ्यांची तत्परताः गोटेटोला या अतिदुर्गम वस्तीपर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. यामुळे कोणताही विलंब न करता CHO (सामुदायिक आरोग्य अधिकारी) गजानन शिंदे MPW मडावी, ANM सुनंदा आतला, CANM रामटेके आणि रुग्णवाहक राजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तात्काळ वैद्यकीय प्रतिसादः प्रा. आ. के. जारावंडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिल घोनमोडे यांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मातेवर प्रश्थमोपचार केल्याने प्रकृती स्थीर झाली, मातेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला पुढील व विशेष उपचाराकरिता श्री रुग्णालय, गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले आहे.
आरोग्य विभागाची भूमिकाः
गडचिरोली जिल्ह्याची मौगोलीक, डोंगराळ व जंगलव्याप्त अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवताना अनेक अडचणी येतात मात्र, अशा परिस्थितीतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, समर्पण आणि माणुसकी यामुळे एका गर्भवती मातेचे प्राण वाचविण्यात यश आले. उच्च रक्तदाब असलेल्या सर्व गर्भवती मातांनी नियमित आरोग्य तपासणी व उपचार करणे आणि आरोग्य कर्मचान्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हापरिषद,गडचिरोली,