पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाचे प्रवर्ग जाहिर
गडचिरोली, (जिमाका) दि.15 ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील संपुर्णतः अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या 07 पंचायत समित्यांच्या सभापतींची पदे तसेच अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या पंचायत समित्या वगळून उर्वरित 5 पंचायत समित्यांच्या सभापतींची पदे, महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, 1962 च्या नियम 2 फ (2) (6) मधील तरतुदीनुसार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलासह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदाचे आरक्षण गडचिरोली जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, 1962 चे नियम 2 फ मधील पोटनियम 2 (अ) 3 (अ) 4 (अ) ब 5 (अ) अन्वये प्राप्त आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 10 ऑक्टोबर, 2025 रोजी झालेल्या पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडतचे अनुषंगाने जिल्हाधिकारी गडचिरोली याद्वारे गडचिरोली जिल्हयातील पंचायत समितीच्या सभापतीची पदे अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) अराखीव / अनारक्षित आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलासह) पंचायत समितीकरिता राखीव पदे म्हणून अधिसूचित करीत आहे.
1)पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाचा प्रवर्ग-अनुसूचित जमाती (महिला), पंचायत समितीचे नाव- कोरची, 2) आरक्षणचा प्रवर्ग- अनुसूचित जमाती- कुरखेडा, 3)आरक्षणाचा प्रवर्ग-अनुसूचित जमाती-धानोरा, 4) आरक्षणाचा प्रवर्ग-अनुसूचित जमाती (महिला)- एटापल्ली, 5) अनुसूचित जमाती- भामरागड, 6) अनुसूचित जमाती (महिला)- अहेरी.7) अनुसूचित जमाती (महिला)- सिरोंचा, 8) ना.मा.प्र.(महिला)-गडचिरोली, 9) अनुसूचित जमाती (महिला)-चामोर्शी, 10) अनुसूचित जाती (महिला)- मुलचेरा, 11) ना.मा.प्र.- देसाईगंज, 12) ना.मा.प्र. – आरमोरी.
ग्राम विकास महाराष्ट्र शासन, अधिसूचना क्र. जिपनि-2025/प्र.क्र.12/पं.रा.-2, दिनांक 09 सप्टेंबर, 2025 अन्वये अधिसूचित पंचायत समितीच्या बाबतीत सभापती पदाचे आरक्षण पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता लागू राहील. असे जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
0000