Home Breaking News *ग्रीन स्टील उद्योगांसाठी धोरण तयार करण्याचे आदेश* – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*ग्रीन स्टील उद्योगांसाठी धोरण तयार करण्याचे आदेश* – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

100

*ग्रीन स्टील उद्योगांसाठी धोरण तयार करण्याचे आदेश*

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 06 – महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत असून, या क्षेत्रामध्ये होत असलेल्या भरीव कामामुळे एक मोठी ‘ग्रीन इकोसिस्टीम’ निर्माण होणार आहे. तसेच ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने या ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

 

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचीची १३ वी बैठक आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगास सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोठे विशाल व अतिविशाल उद्योगांना प्रथम्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक कर संरचनेच्या बदलामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील वस्त्रोद्योग उद्योगावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर विद्युत शुल्क सवलतीची औद्योगिक अनुदानातून वजावट केली जाणार नाही. तसेच विदर्भ, मराठवाडा या वर्गीकृत क्षेत्रकरिता कॅप्टीव्ह प्रोसेस व्हेंडर संदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे वर्गीकरण “अ” व “क” वर्गीकृत तालुका क्षेत्रात करण्यात आले असल्याने खेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व खेड डेव्हलपर्स लि. यांना “क” वर्गीकृत तालुक्याचे फायदे लागू करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला. मे. ओपी मोबिलीटी एक्सटेरिअर इंडिया प्रा. लि. या कंपनीत 90 टक्के महिला कार्यरत असून या कंपनीने पुणे जिल्ह्यातील कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे या कंपनीस मोठ्या प्रकल्पांचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला. त्याचबरोबर, थ्रस्ट सेक्टर धोरणांतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन देय करण्यासंदर्भात ग्रीन स्टील संदर्भात नियुक्त होणाऱ्या समितीने विचार करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिन (नगरविकास) असिमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, सचिव (उद्योग) डॉ.पी.अन्बळगन, सचिव (वस्त्रोद्योग) अंशू सिन्हा, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु उपस्थित होते.

000

Don`t copy text!