मामाच्या मुलाच्या लग्नावरून घरी परत येताना पतीसह गरोदर पत्नी आणि मुलगी ठार
जालना -जिल्हा प्रतिनिधी
भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका परिवारातील पती -पत्नी,मुलगी ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील पती -पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाल फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की विकास अण्णासाहेब जाधव वय 28वर्ष व पत्नी वय 23वर्ष आणि मुलगा अथर्व वय 4 वर्ष मुक्काम रोहिलगड तालुका अंबड हे उमापूर येथे मामाच्या मुलाचे लग्न लावून दुचाकीने गावाकडे येत होते.दरम्यान महाकाला फाट्याजवळ भरगाव कंटेनरने समोर चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली.यावेळी कंटेनरने दोन्ही दुचाकींना दूरपर्यंत फरपटत नेल्या.अपघातस्थळी असलेल्या ग्रामस्थांनी व काही वाहनचालकांनी वाहन थांबवत या कंटेनरला थांबवले.मात्र चालक पळून गेला.यावेळी नागरिकांनी दुचाकीवरील जखमींची पाहणी केली असता तिघेही मृत अवस्थेत आढळून आले.
दुसऱ्या दुचाकीवरील संतोष बनसोडे वय 29 व त्यांची पत्नी मोनिका वय 25 मुक्काम वलदगाव हे या अपघातात गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान या भीषण घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले,जमादार रामदास केंद्रे, दीपक भोजने आणि ग्रामस्थानी मयताणा काढण्यासाठी मदत केली.तसेच वाहतूक सुरू करण्यासाठी एक ते दीड तास अवधी लागला.एक हसते खेळते कुटुंब उध्वस्त झाल्याने जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.