*गडचिरोली: इंदाराम येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये उत्स्फूर्त पक्षप्रवेश; पक्षाला अहेरी तालुक्यात नवे बळ*

205

*गडचिरोली: इंदाराम येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये उत्स्फूर्त पक्षप्रवेश; पक्षाला अहेरी तालुक्यात नवे बळ*

 

गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला अहेरी तालुक्यात मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि *माजी मंत्री आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम* यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच *सिनेट सदस्या मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, रवींद्रबाबा आत्राम ,रामेश्वरबाबा आत्राम , किशोर कर्मे ग्राम. सदस्या* यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदाराम (Indaram) येथील अनेक युवकांनी आज उत्स्फूर्तपणे पक्षप्रवेश केला.

या युवा वर्गाच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार गट) अहेरी तालुक्यात मोठे नवचैतन्य आणि नवे बळ प्राप्त झाले आहे. युवा वर्गाने पक्षावर दाखविलेला हा विश्वास म्हणजे पक्षाच्या जनसंपर्क आणि विकासधोरणांवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत मा. तनुश्रीताई आत्राम यांनी यावेळी व्यक्त केले.

*या युवकांनी केला पक्षप्रवेश:*

* उमेश कोरेत

* रमेश आत्राम

* संपत कोरेत

* गणपत तावाडे

* पुनेश नैताम

* गोवर्धन जिट्टीवार

* राकेश शेडमेक

* रवी तलांडे

* अशोक कोरेत

* निलेश पोरतेट

* लक्षण नैताम

* संजय चौधरी

* राकेश कलाके

* संजय कोरेत

* पोचला कांबळे

* दामोदर वाघाडे

* विनोद कांबळे

* मनोहर तावाडे

या सर्व युवकांनी पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धोरणांनुसार कार्य करून स्थानिक विकासात आपले योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

👇👇👇👇👇👇

*🔗 FACEBOOK*

https://www.facebook.com/share/p/19NcJ6Qkpc/