बाप लेकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

296

मुल मारोडा मार्गावरील मोठी घटना 

बाप लेकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

प्रतिनधी/ दि.८/१० , मुल तालुक्यातील मुल मारोडा मार्गावर बल्की देवस्थानाजवळ आज दुपारी १.०० वाजताच्या सुमारास दोन दुचाकीच्या जबर धडकेत दोघांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मारोडा येथील वडील व मुलगा शेती संदर्भातील आनलाईनची कामे आटोपून गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच ३४ बी एक्स ८८६३ दुचाकीने परत जात असताना दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक. एम एच ३४ ए वाय ४३३२ या दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक बसल्याने दोन इसमाचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. यात यश देविदास शेंडे वय 22 वर्षे , देविदास कवडूजी शेंडे वय 45 वर्षे, राहणार मारोडा, व किसन सहारे वय 54 वर्षे राहणार शिवापूर चक याचा याचा समावेश आहे.

मुल पोलिसांनी घटना स्थळाला भेट देत पंचनामा केला व प्रेत उतरिय तपासणी करून कुटुंबियांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.