माजी आमदार डॉ . नामदेवराव उसेंडी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

42

माजी आमदार डॉ . नामदेवराव उसेंडी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

 

नागपूर :- या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांच्या सद्यस्थितीबाबत तसेच भविष्यातील आवश्यक प्रकल्पांविषयी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात विशेषतः आदिवासी दुर्गम असलेले माडेमुल पुलियाचे बांधकाम, गडचिरोली –आरमोरी राष्ट्रीय महामार्गाचे रोडचे काम करण्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय महामार्गादरम्यान येणाऱ्या आष्टी-येणापूर महामार्गवरील दोन्ही बाजूचे आरसीसी ड्रेन , पॅडिस्ट्रियल गार्डन रेलिंग, बीटी पॉवेल शोल्डर चे बांधकामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वरील सर्व कामे करण्याची अत्यंत्य आवश्यकता असल्यामुळे ते कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कारवाही करून कामे मार्गी लावण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्याना फोन लाऊन वरील कामे तत्काळ मार्गी लावण्याचे सूचना करण्यात आल्या.

सोबतच गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थामार्फत बांबू फ्लोरिंग टाईल्स तयार केले जातात. तयार झालेले टाईल्स दाखवण्यात आले.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन ना. गडकरी साहेब यांनी नेहमीप्रमाणेच संवेदनशीलतेने विषय ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या ठाम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशातील रस्ते विकासाचा वेग वाढला असून गडचिरोली जिल्ह्यालाही या विकासप्रवाहाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, पंकज खोबे उपस्थित होते.