जनसामान्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर

18

 

जनसामान्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर

हर्षल गेडाम यांचा स्तुत्य उपक्रम — साईनगर येथील रस्त्यावरील खड्डे बुजवून जोपासली सामाजिक बांधिलकी

 

दिनांक: 17 ऑक्टोबर 2025, गडचिरोली

 

गडचिरोली शहरातील साईनगर प्रभाग क्र.2 येथील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनली होती. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले होते, त्यामध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला होता. नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता, तसेच आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत होता.

 

या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाजपा शहर महामंत्री हर्षल गेडाम यांनी पुढाकार घेतला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून रस्ता तात्पुरता तरी चालण्यायोग्य झाला आहे.

 

प्रभागातील नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गेडाम यांनी आमदार मिलिंदजी नरोटे यांच्याकडे हा प्रश्न मांडून पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. “प्रभागाचा विकास आणि नागरिकांचे हक्क यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी सांगितले.

 

या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी हर्षल गेडाम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून अशा प्रकारच्या सामाजिक सहभागातून प्रशासनालाही प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले.