*सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद क्षेत्रात डॉ.लुबना हकीम यांची उमेदवारी चर्चेत.*
*जनतेच्या मनात ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’ म्हणून नाव घेण्यास सुरुवात.!*
*मुलचेरा: –*
जिल्हा परिषद निवडणुकांची सरगर्मी वाढत असताना सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे युवा नेते तथा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम यांच्या सौभाग्यवती डॉ.लुबाना हकीम यांची उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे.सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या डॉ.हकीम या शिक्षण महर्षी स्वर्गीय बब्बूजी हकीम व जेष्ठ समाजसेविका चाचम्मा हकीम यांची नातं आहे.त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत.
आज मतदारसंघातील नागरिक ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’ म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले आहेत.
स्थानिक पातळीवर विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन,महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम,तसेच शिक्षण व स्वच्छता क्षेत्रातील योगदानामुळे डॉ.हकीम यांची जनमानसात सकारात्मक छाप निर्माण झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या काही स्थानिक बैठकींमध्ये त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून जनतेच्या मनात असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो.अनेक युवक आणि महिला वर्गाने त्यांना खुले पाठबळ जाहीर केले आहे.
राजकीय वर्तुळातही त्यांची उमेदवारी गंभीरपणे घेतली जात असून,स्थानिक पातळीवर नवा पर्याय म्हणून डॉ.लुबना हकीम यांचे नाव पुढे येत आहे.
आगामी काळात अधिकृत उमेदवारी जाहीर झाली तर, सुंदरनगर-गोमणी जिल्हा परिषद क्षेत्रात ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.