*सरकारने तात्काळ कारवाई करून भरपाई द्यावी नवनाथ ऊके यांची मागणी*
*गडचिरोली : पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगाव गावात हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या धानाच्या शेतीवर हल्ला चढवून मोठे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्ग सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी करीत आहे.शेतकऱ्यांनी सांगितले की, १७ ऑक्टोंबर रोजी पहाटे सुमारास हत्तींचा कळप आमच्या शेतात घुसला आणि संपूर्ण धानाची शेती पायदळी तुडवून टाकली. सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्री,नवनाथ उके यांनी नुकसानग्रस्त शेतांची बांधावर जाऊन पाहणी केली.व त्यांनी ही सम्पूर्ण घटना जिल्ह्याचे सहपालक मंत्री मा,श्री,आशीषजी जैसवाल यांना सांगितले या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मांगनी केली या प्रसंगी गोगांव-अड़पल्ली येथील शेतकरी व गावकारी उपस्थित होते*






