नव्याने सुरु होणा-या कोवीड सेंटरची आ.भोंडेकर यांनी केली पाहनी..

98

नव्याने सुरु होणा-या कोवीड सेंटरची आ.भोंडेकर यांनी केली पाहनी..
– वाढत्या कोरोनाच्या उपाय योजनांबाबद जिल्हाधिका-यांसोबत चर्चा..

प्रतिनिधी/भंडारा: जिल्हयात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे रूग्णांना बेड मिळत नाही,त्यावर उपाय म्हणून लाल बहादूर शास्त्री विद्यालयात सुरू होत असलेल्या २५०ते ३०० बेडच्या नवीन कोवीड सेंटरची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाहणी केली. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवर उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचा भयंकर प्रकोप वाढला असून ग्रामीण भागातील रूग्ण भंडारा शहरात उपचारासाठी येत आहेत,अनेक रूग्णांना बेड मिळत नसल्यामुळे उपचाराअभावी रूग्ण दगावत आहेत.हा धोका लक्षात घेवूनच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिले होते,पवनी येथे १०० व भंडारा येथे २५० बेड वाढविण्यात आले,तरीसुध्दा बेड कमी पडत असल्याने आता लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात २५० ते ३०० बेडचे नवीन कोवीड सेंटर उभारले जात आहे ज्याची आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाहणी केली.शहरात रेमडेशिवीर,आक्सीजन बेड,कोरोना प्रतिबंधक लस याचा तुटवडा असल्याच्या व औषधाची काळाबाजारी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत,यासंदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेवून तात्काळ उपाययोजनांबाबद सविस्तर चर्चा केली.