*अडपल्ली (चक) मलेझरी येथे शिंदे सेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न*
*कालीनगर – विवेकानंदपूर क्षेत्रात शिवसेनेची मोर्चेबांधणी वेगाने सुरू*
*मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली (चक) मलेझरी येथे शिवसेना (शिंदे गट) चा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर विश्वास दाखवत जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, शिवसेना नेत्या छायाताई कुंभारे आणि तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला*.
*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालीनगर – विवेकानंदपूर क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाने जोरदार संघटनबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांतील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला*.
*या सोहळ्याचे नेतृत्व मलेझरी येथील युवा नेते संदीप चौधरी यांनी केले. त्यांनी सांगितले की, “इतर राजकीय पक्षांनी आमचा वापर केवळ निवडणुकीपुरता केला. निवडून आल्यानंतर आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्ही जनसामान्यांचा आधार असलेल्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला*.”
*जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्या जनतेच्या पाठीशी उभी राहिली आहे. पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य न्याय आणि संधी दिली जाईल*.”
*शिवसेना नेत्या छायाताई कुंभारे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणावर विश्वास ठेवते. कोणतीही समस्या असल्यास आम्ही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करू*.”
*कार्यक्रमाला तालुका प्रमुख गौरव बाला, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते*.
*या सोहळ्यात जुमनाके पाटील, पुंडलिकराव चौधरी, मारोती झाडे, शुभम दिलीप उपासे, काशीनाथ लाबांडे, मारोती नेवारे, आकाश आभारे, पार्थ उपासे, शिवशंकर शुभम चौधरी, रवि इजगिरवार, लोमेश चौधरी, भारत डाकोडे, रामचंद्र झाडे,दिलीप उपासे, रावजी डाकोडे, नामदेव चौधरी, प्रदिप सेडमाके मधुकर कन्नाके मंगेश गायकवाड जोगेब्बर चौधरी, बंडू चौधरी, विमल चौधरी, साईनाथ चौधरी, संदिप येलमुले प्रदिप चौधरी संतोष नागरकर, उमाजी नेवारे बंटी झाडे, राजेश्वर झाडे, संजय झाडे , स्वप्नील गोहणे , रोशन जूनघरे, दूष्यंत जुनघरे, उर्मिला चौधरी, अरुणा झाडे आशा डाकोडे, सोमा चौधरी राहुल दुबे, भारत चांदेकर राजेंद्र अलोने कुशाब दुर्गे हिरामण चौधरी मनोज पोनालवार विकी सेडमाके, अमित जांबोर विजय चौधरी, विवेक ठूसे, परेश भोयर, सचिन गिरसावळे, मारोती कोहळे, प्रदिप चौधरी, सुधाकर वाठ देविदास नागापूरे सुधाकर जूनघरे, कुशाब दुर्गे आदींनी पक्ष प्रवेश केला*
*कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पाडण्यात स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली*.





