दिनांक 7/11/2025 आमदार निवास नागपूर इथे बहुजन रिपब्लिकन शोषलिस्ट पार्टी ची बैठक संपन्न झाली व लगेच नागपूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जन नायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिनांक 15,16 नोव्हेंबर चा कार्यक्रम गडचिरोली येथे होणार व निवडणुकीत सम विचारी पक्ष सोबत brsp निवडणूक लढणार अशी घोषणा करण्यात आली त्यावेळी बहुजन रिपब्लिकन शोषलिस्ट पार्टीचे संस्थापक ऍडव. डॉ. सुरेश माने साहेब, भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष ऍड. लटारी मडावी, वकील आघाडी अध्यक्ष ऍड. भीमराव शेंडे, नागपूर जिल्हा प्रमुख डॉ. विनोद रंगारी, प्रदेश चे गुलचन रंगारी, गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय वानखेडे, सर्व जिल्हायातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्तित होते.





