भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात जनतेत उत्सुकता
तिकीट कुणाला भेटणार याची नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवाराणा चिंता
गडचिरोली -वृत्तवानी न्यूज
आगामी नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपात व जनतेत खमंग चर्चा सुरू आहे.
काँग्रेसकडून प्राचार्य सौ कविता सुरेश पोरेड्डीवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अश्विनी नैताम हे उमेदवार
असून भाजपामध्ये भाजपाच्या महामंत्री तथा आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.गीता सुशील हिंगे,भाजपाच्याजिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष सौ. योगिता प्रमोद पीपरे,सौ. प्रनोती सागर निंबोरकर,सौ. गायत्री सोमनकर ,सौ.बेबीताई चिचघरे या दावेदार असून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. नगरपरिषद उमेदवाराची सुद्धा अवस्था तशीच आहे. एका वॉर्डातून अनेक लोक उत्सुक असल्याने तिकीट कोणाला द्यायची अशी अवस्था भाजपा व काँग्रेसची झालेली आहे.येत्या एक दोन दिवसातच चित्र स्पष्ट होणार आहे.





