ग्रामपंचायत मुरखळा (नवेगाव) येथील नळ पाणी पुरवठा योजना अनिश्चित कालावधीकरिता बंद.
मौजा मुरखळा (नवेगाव) येथील नळ पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती (Operation & Maintanance) ची निविदा मे. मॉ. दुर्गा कन्स्ट्रक्शन (प्रो.प्रा. रितेश गडपल्लीवार) यांना मिळालेली होती. मागील तीन वर्षापासून पाणी पुरवठा वितरीत करण्याची व दुरुस्तीची कामे सुरळीत सुरु होती परंतु सन २०२४-२५ निविदेतील १५,४८,०००/- रुपयाचे देयक अदा करण्यात आलेले नव्हते, ग्रा.पं. प्रशासनाकडे बाकी होते. सन १ एप्रिल, २०२५ ते ३१ मार्च २०२६ च्या निविदेतील ०१/०४/२०२५ ते ३१/१०/२०२५ या कालावधीचे देयक १५,२१,०००/- हे सुध्दा ग्रा.पं. प्रशासनाद्वारे अदा करण्यात आलेले नाही. दोन्ही देयकाची एकूण रक्कम ३०,६९,०००/- स्थगित असल्यामुळे व ग्रा.पं. प्रशासनाला वारंवार विनंती करुन व पत्र व्यवहार करुन सुध्दा आजपर्यंत देयक अदा करण्यात आले नसल्यामुळे देयकाची संपूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय नळ पाणी पुरवठा योजना आज दिनांक १३/११/२०२५ पासून बेमुदत बंद ठेवण्यात आलेली आहे. असे प्रो.प्रा. रितेश गडपल्लीवार मे. मॉ. दुर्गा कन्स्ट्रक्शन यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.





