गडचिरोलीत काँग्रेसचे भव्य शक्तीप्रदर्शन : कविता पोरेड्डीवार यांचा नामांकन अर्ज दाखल
गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षातर्फे अभूतपूर्व असे भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह मोठ्या जल्लोषात आणि शिस्तबद्ध रितीने आपले नामांकन अर्ज दाखल केले.
जिल्हा काँग्रेस कार्यालयातून सुरू झालेल्या या महामोठ्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी, पक्षाच्या ध्वजाने नटलेले मार्ग आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहराचा परिसर क्षणभर काँग्रेसमय झाला.
आजच्या या शक्तीप्रदर्शनाने काँग्रेसची संघटनबद्ध ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दोन्हींपण ठळकपणे जाणवले. उमेदवारांना मिळालेला मोठा लोकसमर्थन पाहता, आगामी नगरपरिषद निवडणुकीत जनतेचा कल काँग्रेसकडे स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र उमटत आहे.
नामांकन दाखल करतांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, सुरेश सावकार पोरेड्डीवार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.





