क्रीडा संमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास
केंद्रप्रमुख श्री अनिल मार्तीवार यांचे प्रतिपादन
======================== पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत मक्केपल्ली केंद्राच्या केंद्रस्तरीय बाल क्रीडा संमेलनाचे उदघाटन दि. 18-11-2025 रोजी संपन्न झाले. उदघाटनाच्या प्रसंगी श्री. अनिल मार्तीवार,केंद्रप्रमुख तथा आयोजक यांनी मार्गदर्शन करतांना क्रीडा संमेनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन केले.
शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती सौ. निताताई अजय पूडो. सरपंच ग्रामपंचायत कार्यालय हळदवाही , सहउद्घाटक सौ. अलकाताई भास्कर मुजुमकार ,पो. पा. माडेमुधोली, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रुपेश प्रभाकर मेश्राम सभापती शालेय व्यवस्थापन समिती तसेच विशेष अतिथी श्री, राजेश कोत्तावार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, डॉ. शीतल चाटे हळदवाही,मा. कडते साहेब, छत्रपती दुर्गे, उपसरपंच, कविता हिचामी, वसंत पदा,गोपिका राजूरवार,शामराव हिचामी, किशोर फुलझेले , कुंदा पदा, मीनाक्षी मेश्राम, चंद्रशेखर धुर्वे, पौर्णिमा मेश्राम, युवराज गोहणे, ज्योती हिचामी, राकेश वैध, नंदू पदा, ताराबाई मेश्राम,शिल्पा फुलझेले, तसेच केंद्राअंतर्गत सर्व 16 शाळांचे अध्यक्ष, व सर्व सदस्य उपस्थित होते. क्रीडा संमेलनाचे आयोजन केंद्रप्रमुख मा.अनिल मार्तीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अनिल मार्तीवार यांनी केले तर उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अविनाश बारसागडे, मुख्याध्यापक भाडभीडी यांनी केले. सामन्याचे समालोचन मोरेश्वर भैसारे,संतोष गुट्टे, हरिदास कोकणे,संजय पेंदोर, पंकज कुकुडकर, हेमंत दुर्गे, क्षौनिश बिस्वास, संदीप उराडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. विनोद चिटलॊजवार यांनी केले,.
या क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्री. अशोक रायसिडाम,अतुल कुनघाडकर,राहुल गेडाम, अविनाश भोवरे, भारत वासकर,गजानन गेडाम, अशोक खोब्रागडे, उद्धव केंद्रे,अर्चना सेमस्कर, गीता नैताम,सुमित्रा हिचामी, ममता मलिक, वैशाली हलदर, सुजित देवनाथ, धनंजय मंडल, मोरेश्वर पदा, अर्चना हाताळकर,प्रेमीला कुसनाके, कल्पना येनुगवार, तसेच केंद्र माडेमुधोली येथील समस्त गावक-यांचे सहकार्य लाभले.





