दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम अंतर्गत संस्थेची नोंदणी करण्याचे आवाहन
गडचिरोली, (जिमाका) दि.19 नोव्हेंबर: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत शासन निर्णयान्वये दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, म.रा.पुणे यांचे कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत अशासकीय संस्था जे दिव्यांग क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी शासन निर्णय नुसार आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, म.रा.पुणे यांचेकडे नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000





