*लुसियाना विद्यापीठ, अमेरिका तर्फे काशिनाथ भडके यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल ; काँग्रेसच्या वतीने काशिनाथ भडके यांचा जाहीर सत्कार*

57

*लुसियाना विद्यापीठ, अमेरिका तर्फे काशिनाथ भडके यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल ; काँग्रेसच्या वतीने काशिनाथ भडके यांचा जाहीर सत्कार*

 

गडचिरोली ::

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते तसेच सेवानिवृत्त बीडीओ काशिनाथ भडके यांना सेवाकाळात व निवृत्तीनंतर केलेल्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल लुसियाना विद्यापीठ, अमेरिका तर्फे मानद डॉक्टर पदवी बहाल करण्यात आली. या मानाच्या सन्मानाबद्दल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन व्यक्त करण्यात आले.

 

यावेळी काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी जि.प. सदस्य अ‍ॅड. रामभाऊ मेश्राम, नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, शहराध्यक्ष सतीश विधाते, तसेच विजयजी गोरडवार, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, रजनीकांत मोटघरे, दीपक रामने, कल्पनाताई नंदेश्वर, सौं. शीतलताई ठेवरे, सौं. संध्याताई उईके, सौं. मीनलताई चिमुरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.