अनेक समस्यांनी ग्रस्त शासकीय आश्रम शाळा – कॉ. रमेशचंद्र दहिवडे
गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे दृष्टीने शासनाचे वतीने आश्रम शाळा काढण्यात आल्या. आज पन्नास वर्षानंतर दिवसेंदिवस आश्रम शाळा विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहे. आश्रम शाळेच्या व्यवस्थापनावर करोडो रुपये दरवर्षी खर्च केल्या जातात. तसेच करोडो रुपये खर्च करून गगनचुमबी आश्रम शाळांची उभारणी केली असली, तरी बहुतांश आश्रम शाळा मध्ये शिक्षक नाही, चार-चार वर्ग एक शिक्षकाला शिकवावे लागतात. 2024-2025 मध्ये एकशे दहा रोजंदारी कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. आणि हे रोजंदारी कामगार गेल्या आठ-दहा वर्षांपासून काम करीत होते. मात्र 2025-2026 या शैक्षणिक क्षेत्रात केवळ दहा रोजंदारी कामगारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश आश्रम शाळांवर स्वयंपाकी नाही, सफाईगार नाही, कामाठी नाही अशा अवस्थेत शासकीय आश्रम शाळांचा कारभार सुरू आहे. पुरेसे कर्मचारी नसल्याकारणाने कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देखील दिल्या जात नाही. विद्यार्थ्यांना सोयी सवलती पासून तसेच शिक्षणापासून वंचित ठेवून शासनाने आश्रम शाळाच बंद करायचा घाट घातला आहे. असा आरोप चतुर्थश्रेणी आश्रम शाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. कॉ. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे निवेदन सहाय्यक अधिकारी श्रीमान वहीद शेख यांना देण्यात आले. जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे. या प्रमुख मागणीचा समावेश निवेदनात होता. शिष्टमंडळात राहुल मडावी, साईनाथ सिडाम, अशोक खोब्रागडे, गजानन दूधबडे, बाबूदास हलामी, प्रीती देवतळे आदींचा समावेश होता. अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे संतोष धोटे यांनी कळवले.





