गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प: प्रभाग 13 मध्ये प्रणोतीताई निंबोरकर यांचा उत्साहवर्धक जनसंवाद

22

गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प: प्रभाग 13 मध्ये प्रणोतीताई निंबोरकर यांचा उत्साहवर्धक जनसंवाद

 

गडचिरोली, २० नोव्हेंबर २०२५ : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा धडाक्यात शुभारंभ करत नव्या विचारांची, नवा प्रवास सुरू करणारी सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी आज प्रभाग क्र. १३ मध्ये घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आपल्या जनसंपर्क मोहिमेला जोरदार सुरुवात केली.

 

प्रभागातील विविध भागातील रहिवाशांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या स्थानिक समस्या, विकासाच्या गरजा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. शहराचा सर्वांगीण विकास, सुंदर व स्वच्छ गडचिरोली आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची हमी देण्याचा निर्धार त्यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला.

 

नागरिकांनीही “ताई आपली हक्काची” या भावनेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या अपेक्षांची ऊर्जा व्यक्त केली. अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांचे ऊबदार स्वागत केले.

 

या जनसंपर्क मोहिमेदरम्यान नगरसेवक पदासाठीचे उमेदवार देवाजी लाटकर, पुष्पाताई करकाडे आणि भारतीताई नवघडे उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळाले.

 

प्रभाग क्र. १३ मध्ये आज झालेल्या या भेटीत सकारात्मक वातावरण, नागरिकांचा विश्वास आणि विकासाच्या दिशेने दृढनिश्चय या सर्वांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला.

 

नागरीकांचा उत्साह आणि ताईंवरील विश्वास पाहता आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १३ मध्ये बदलाची नवी चाहूल लागली आहे.