गडचिरोली : प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपा उमेदवाराची घरभेट मोहिम ;  नागरिक – जनसंवादातून उभ्या राहिलेल्या विकासाच्या नव्या अपेक्षा

81

गडचिरोली : प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपा उमेदवाराची घरभेट मोहिम ;

नागरिक – जनसंवादातून उभ्या राहिलेल्या विकासाच्या नव्या अपेक्षा

 

दि. २१ नोव्हेंबर २०२५, गडचिरोली – नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.१२ मध्ये आज घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या भेटीमध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी स्थानिक रहिवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा आणि दैनंदिन अडचणींची माहिती जाणून घेतली.

 

नागरिकांनी आपल्या गरजा आणि समस्या स्पष्ट करत स्वच्छ व सुबक शहर, मूलभूत सेवांची गुणवत्ता आणि विकासाचे सातत्य याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. भेटीदरम्यान अनेक रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांबाबत सुचना मांडल्या.

 

या संवाद मोहिमेत नगरसेवक पदासाठी इच्छुक साक्षीताई आकाश बोलूवार आणि निखिलभाऊ कारूजी चरडे हेही उपस्थित होते. त्यांनी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना व अडचणींची नोंद घेत प्रभागाच्या पुढील नियोजनाबाबत चर्चा केली.

 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या या घरभेटी उपक्रमामुळे प्रभागातील प्रत्यक्ष गरजा, नागरिकांचे अपेक्षांचे बदलते स्वरूप आणि विकासासंबंधी महत्त्वाचे मुद्दे अधिक स्पष्ट झाले असल्याचे स्थानिक निरीक्षकांचे मत आहे.