प्रभाग क्रमांक 11 मधील रेव्हेन्यू कॉलनी परिसरात आमदार डॉ.मिलिंद नरोटे
भाजप उमेदवार अनिल तिडके व पायल आलाम यांच्या सोबत प्रचार दौरा
नगरपरिषद 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 11 मधील रेव्हेन्यू कॉलनी परिसरात प्रचार दौरा करण्यात आला.
या प्रचारादरम्यान भाजप उमेदवार पायलताई आलाम (कोडापे) व श्री. अनिलजी तिडके यांच्यासोबत घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, लाईट आणि इतर महत्त्वाच्या समस्या मनपूर्वक ऐकून त्यांचे सुयोग्य निराकरण लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम झाल्या तरच नागरिकांच्या मूलभूत गरजा प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतात. विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभार यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आपल्या विश्वासाच्या बळावर प्रभाग क्रमांक 11 तथा गडचिरोली नगरपरिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न पुढेही अविरत सुरू राहतील.





