*_देऊळगावमध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या महिलांच्या कुटुंबीयांची भेट: माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सांत्वनपर भेट व आर्थिक मदत यासोबतच तातडीच्या कारवाईची सूचना_*
देऊळगाव ता.आरमोरी | दि. २१ नोव्हेंबर २०२५
आरमोरी तालुक्यातील स्व. सरस्वती झिंगरजी वाघ (वय ७० वर्ष) या दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. परत न आल्याने शोध सुरू झाला, मात्र काही दिवसांनी त्यांचा मृतदेह वाघाच्या हल्ल्यातील अवस्थेत सापडला.
यानंतर स्व. मुक्ताबाई दिवाकर नेवारे (वय ६९ वर्ष) या दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी लाकूड गोळा करताना वाघाच्या अचानक हल्ल्यात ठार झाल्या.
देऊळगाव येथे झालेल्या या दोन्ही स्वतंत्र पण अत्यंत हृदयद्रावक घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना भेट देत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी दुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या प्रसंगी त्यांनी व्यक्तिगत आर्थिक मदत देखील प्रदान केली.
घडलेल्या दुर्दैवी घटनांची माहिती मिळताच मा.खा. डॉ. नेते यांनी तातडीने देऊळगाव गाठले. कुटुंबीयांशी मनमोकळ्या संवादातून त्यांनी त्यांच्या व्यथा समजून घेत परस्परांना धीर देत सांत्वन व्यक्त केले.
*वाघाला तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश*
या संदर्भात मा.खा. डॉ. नेते यांनी मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित वाघाला तातडीने पकडण्याची आणि पीडित कुटुंबीयांना त्वरित मदत देण्याची सूचना केली.
ग्रामीण भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देऊळगाव परिसरात अल्प कालावधीत झालेल्या दोन्ही वाघहल्ल्यांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यावेळी या सांत्वन भेटीत जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, मनोहर सुंदरकर,पंकज फुरेल्लीवार, नरेंद्र बनपुरकर, विकास पायडलवार,योगाजी कुकुडकर,डॉ. कुमरे,पंकज जांबुळे,तिजेंद्र गरमळे,सौरभ सुंदरकर,रवि ननावरे,कुमार सुंदरकर तसेच गावातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.





