पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचें एक दिवसीय शेतकारी प्रशीक्षण

41

ता. ऐटापल्ली जि. गडचिरोली

आज दिनांक 25/11/2025 ला ऐटापल्ली तालुक्यात पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचें एक दिवसीय शेतकारी प्रशीक्षण आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत फार्मर कप 2026 या महत्त्वाकांक्षी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. अरुण बी वसवाडे उपस्थित होते. तसेच मडंळ कृषी अधिकारी श्री एच के राऊत व कृषी विभागातील उप कृषी अधिकारी साहाय्यक कृषि अधिकारी सक्रिय उपस्थित होते. पाणी फाउंडेशनचे रीजनल समन्वयक श्री अभीजीत गोडसे ,श्री. दविदास कडते व अक्षय आतला यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीत पाणी फाउंडेशनच्या कार्याची ओळख, फार्मर कप स्पर्धेचा उद्देश, तसेच निवासी प्रशिक्षणांची पद्धत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फार्मर कप 2026 ही मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असून महाराष्ट्रातील 351 ग्रामीण तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कृषी विभाग या स्पर्धेची संपूर्ण कार्यवाही मोठ्या प्रमाणावर हाती घेत आहे. खरीप हंगामावर आधारित या स्पर्धेमध्ये 36 विविध पिकांचा समावेश राहणार आहे.गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असल्याचे मार्गदर्शन सत्रात स्पष्ट करण्यात आले.त्या नंतर सर्व जमलेल्या शेतकर्यानां महाकृषी अप्प चे महत्व अॅप डाऊलोड करणे रजीस्ट्रेशन करणे त्याचा वापर बाबत विस्तृत माहीती दिली.

या कार्यक्रमासाठी ऐटापल्ली तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कृषी विभागाने काटेकोरपणे केले. हा कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालया तील सभाग्रहात येथे पार पडला.